सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

खा. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ‘भावकी : एक न उकललेलं गूढ’ पुस्तकाचे प्रकाशन

On: July 5, 2026 3:41 PM
Follow Us:

फलटण – संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या आणि प्रकाशनापूर्वीच विक्रमी प्रतींची विक्री झालेल्या लेखक सचिन गोसावी लिखित ‘भावकी : एक न उकललेलं गूढ’ या प्रेरणादायी व रहस्यमय पुस्तकाचा प्रकाशन सोहळा साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

या सोहळ्यास प्रसिद्ध साहित्यिक अ‍ॅड. आकाशभाऊ आढाव, कवयित्री प्रतिक्षा आढाव, कराड-पाटण शिक्षक सोसायटीचे संचालक प्रविण मोरे, आदर्श शिक्षिका प्रतिभा भारती-गोसावी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, “सचिन गोसावी यांनी अत्यंत ज्वलंत विषयावर निर्भीडपणे लेखन केले आहे. हे पुस्तक समाजात भांडण निर्माण करणारे नसून भांडण मिटवणारे आहे. समाजपरिवर्तनाच्या दिशेने हे पुस्तक निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल.”

लेखक सचिन गोसावी यांनी सांगितले की, हे पुस्तक समाजप्रबोधनाच्या उद्देशाने लिहिले असून, नातेसंबंधांमधील कटु अनुभव, वैफल्य आणि नैराश्यावर मात करून आयुष्यात पुढे कसे जायचे, तसेच भावकीसोबत योग्य पद्धतीने कसे वागायचे, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून करण्यात आले आहे. मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हे पुस्तक लवकरच महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सचिन गोसावी यांच्या यापूर्वी प्रकाशित झालेल्या ‘आरंभ है प्रचंड’ या प्रेरणादायी पुस्तकाच्या २५ हजारांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. तसेच ‘आरोग्यातून यशाकडे’ या पुस्तकाची महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांनी इयत्ता ११ वी व १२ वीच्या अभ्यासक्रमासाठी निवड केली आहे.

मोटिवेशनल व्याख्याते म्हणूनही सचिन गोसावी यांनी महाराष्ट्रभर विविध विषयांवर व्याख्याने दिली असून, त्यांच्या दर्जेदार लेखनाला वाचकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

हे ही वाचा  डॉ. आंबेडकरांनी वंचित, उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणले - प्रा. डॉ. प्रभाकर पवार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!