सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, तुकाराम मुंढे यांच्याकडे चौकशीची जबाबदारी

On: October 12, 2026 8:43 AM
Follow Us:

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारातील  गैरप्रकार, पेपरफुटीचे आरोप आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या चौकशीसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मध्यरात्री महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. तसेच, एमपीएससीमधील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या सचिवपदी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चौकशी समितीच्या माध्यमातून आयोगाच्या कामकाजातील त्रुटी,  पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततांची तपासणी केली जाणार आहे. समितीला दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत आणि २०२७ च्या परीक्षेद्वारे भरल्या जाणाऱ्या गट-क पदांची संख्या वाढविण्याबाबतही आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयांमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे हे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणूनही आपली जबाबदारी कायम ठेवणार असून, एमपीएससी चौकशी समितीचे सचिवपद त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून सोपविण्यात आल्याचे वृत्त आहे. सरकारच्या निर्णयानंतर पुण्यात गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर स्थगित करण्यात आले. आता चौकशी समितीच्या अहवालातून कोणती माहिती समोर येते, कथित गैरप्रकारांबाबत काय कारवाई होते आणि परीक्षा प्रक्रियेत कोणत्या सुधारणा केल्या जातात, याकडे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा  पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी, राज ठाकरे उद्या भेटणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!