सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी, राज ठाकरे उद्या भेटणार

On: October 4, 2026 6:47 PM
Follow Us:

पुणे : MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची तसेच परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी करत पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दर्शवला असून ते विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहिले. परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यात जाऊन उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आंदोलनाला आणखी राजकीय पाठिंबा मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शासन आणि MPSC प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, तसेच राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आंदोलनाची दिशा काय ठरते, याकडे आता लक्ष लागले आहे.

हे ही वाचा  MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, तुकाराम मुंढे यांच्याकडे चौकशीची जबाबदारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!