फलटण – मंत्री नितीन गडकरी यांनी फलटण येथे आयोजित पालखी मार्ग पत्रकार परिषदेत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग प्रकल्पांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. वारकऱ्यांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांना गती देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग (NH-965) हा सुमारे 234 किमी लांबीचा असून त्यासाठी ₹7,625 कोटी खर्च करण्यात येत आहे. तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (NH-965G) हा 130 किमी लांबीचा असून त्यासाठी ₹4,416 कोटी खर्च केला जात आहे.
या मार्गांवर वारकऱ्यांसाठी स्वतंत्र 3.5 मीटर लेन, महत्त्वाच्या शहरांसाठी बायपास, फ्लायओव्हर, अंडरपास आणि आधुनिक पूल उभारण्यात येत आहेत. दिवेघाटातील रस्त्याचे चौपदरीकरण एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याचेही सांगण्यात आले.
फलटण शहरासाठी ₹97 कोटींचा “वन टाइम इम्प्रुव्हमेंट” प्रकल्प मंजूर करण्यात आला असून अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण, राव रामोसे पुलाचे काम आणि निरा रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्यात येणार आहे.
याशिवाय जेजुरी फ्लायओव्हर, पंढरपूर रिंग रोड आणि तोंडले येथे फ्लायओव्हरचीही घोषणा करण्यात आली.
पालखी मार्गासाठी नितीन गडकरींच्या मोठ्या घोषणा; फलटणला ₹97 कोटींच्या विकासकामांची भेट
By Team LBNN
On: May 14, 2026 4:21 PM







