सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण मार्केट यार्डमध्ये कांद्याला तेजी; प्रतिक्विंटल 3 हजार रुपयांचा उच्चांक

On: July 14, 2026 9:03 PM
Follow Us:

फलटण – कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटणच्या मुख्य बाजारात मंगळवार दि. 14 जुलै 2026 रोजी कांदा बाजारात तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. आज बाजारात 1,960 क्विंटल (3,920 पिशव्या) कांद्याची आवक झाली.

बाजार समितीच्या माहितीनुसार कांद्याला किमान 600 रुपये, कमाल 3,000 रुपये तर सरासरी 1,800 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. दर्जेदार कांद्याला व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी असल्याने दरात वाढ झाल्याचे दिसून आले.

आजच्या लिलावात मे. तनमन ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवर कांद्याला प्रतिक्विंटल 3,000 रुपये हा दिवसातील सर्वाधिक दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, पुढील काही दिवस बाजारातील आवक व मागणीवर दराची दिशा अवलंबून राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा  मोबाईल झिरो डाउन पेमेंटवर; तरीही ग्राहकांची लूट? फलटण शहरातील प्रकार चर्चेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!