सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

रेस्क्यू तज्ज्ञ मंगेश कर्वे यांची तत्परता; विहिरीत अडकलेल्या कोल्ह्याला मिळाले जीवदान

On: May 29, 2026 9:50 PM
Follow Us:

फलटण : पाडेगाव ता. फलटण येथील चांभारमळा परिसरात विहिरीत पडून अडकलेल्या एका कोल्ह्याची वनविभागाने धाडसी बचाव मोहीम राबवत सुखरूप सुटका केली. या कारवाईमुळे एका वन्यजीवाचे प्राण वाचले असून वनविभागाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पाडेगाव येथील शेतकरी राहुल शिंदे हे आपल्या शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीत एक कोल्हा अडकलेला दिसून आला. सिमेंट रिंगने बांधलेल्या विहिरीतून बाहेर पडणे त्याला शक्य नसल्याने तो बराच वेळ विहिरीतच अडकून पडला होता. रात्रीच्या वेळी अन्नाच्या शोधात फिरताना तो विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेची माहिती मिळताच फलटण वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक उपवनसंरक्षक दिगंबर जाधव आणि वनक्षेत्रपाल निकिता बोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल महादेव पाटील, वनरक्षक देवकी तहसीलदार, रेस्क्यू सदस्य मंगेश कर्वे, सचिन जाधव, गणेश गुळवे तसेच टीम ग्लोबल अर्थ फाउंडेशन, फलटण यांच्या सहकार्याने बचावकार्य सुरू करण्यात आले.

काही वेळ चाललेल्या प्रयत्नांनंतर कोल्ह्याला सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्याची प्रकृती तपासून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

वन्यजीव संवर्धनासाठी वनविभागाने दाखविलेल्या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत बचाव पथकाचे अभिनंदन केले.

हे ही वाचा  पुरोगामी महाराष्ट्रात अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या सामाजिक न्यायाचा लढा थांबू नये – सचिन साठे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!