फलटण : महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात वनसेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते व सहाय्यक वनसंरक्षक दिंगबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र फलटण व वनसेवा केंद्र आदर्की अशी दोन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
लोकसेवा हमी कायद्याअंतर्गत वनविभागाच्या १३ विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये वन्यप्राण्यांकडून होणारी पशुधन नुकसान भरपाई, पिकांचे नुकसान भरपाई प्रस्ताव, वनेत्तर क्षेत्रातील वृक्षतोड परवानगी, तसेच ना हरकत प्रमाणपत्र यांसारख्या सेवांचा समावेश आहे.
या वनसेवा केंद्रांमध्ये नागरिकांचे परिपूर्ण प्रस्ताव स्वीकारले जाणार असून, सेवा अधिक जलद व पारदर्शक पद्धतीने मिळणार आहेत. गतिमान प्रशासनाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर यांनी व्यक्त केले आहे.
याशिवाय वनसेवा केंद्र फलटण व वनसेवा केंद्र आदर्की यांच्या कार्यक्षेत्रातील गावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. वनसेवा केंद्र फलटण अंतर्गत आंदरुड, भाडळी बुद्रुक, भाडळी खुर्द, दुधेबावी, जावळी, सोनवडी बुद्रुक, मिरडे, वडले, फलटण, अलगुडवाडी, ठाकूरकी, कांबळेश्वर, निंभोरे, काशीदवाडी, ठवकेवाडी, खडकी, मिरगाव, सोमंथळी, सुरवडी, तावडी, वडजल, विंचुर्णी, गिरवी, बोडकेवाडी, धुमाळवाडी, निरुगुडी, मिरेवाडी, दालवडी, मांडवखडक, उपळवे, वेळोशी, बरड, खटकेवस्ती, गुणवरे, कुरवली बुद्रुक, दतनगर, मठाचीवाडी, निंबळक, राजाळे, राजुरी, भवानीनगर, सरडे, टाकळवाडे, सांगवी व सोनगाव या गावांचा समावेश आहे.
तर वनसेवा केंद्र आदर्की अंतर्गत आदर्की बुद्रुक, आदर्की खुर्द, आळजापूर, कापशी, आरडगाव, हिंगणगाव, शेरेचीवाडी, सालपे, तांबे, कोपर्डे, बिबी, घाडगेवाडी, कोन्हाळे, मलवडी, मुळीकवाडी, नांदल, वाघोशी, वडगाव, ठवळ, पिराचीवाडी, तरडफ, ताथवडे, वाखरी, होळ, काळंज, डोंबाळवाडी, कोरेगाव, पाडेगाव, रावडी खुर्द, कुरसूर, खामगाव, सासवड, टाकूबाईचीवाडी, तडवळे, तरडगाव, चव्हाणवाडी व विठलवाडी या गावांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित गावांतील नागरिकांनी वनविभागाच्या विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या वनसेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.







