सातारा : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, दोशी यांच्या अनुपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. असल्याची माहिती मिळत आहे.
सदर प्रकरणात निवडणुकीच्या दिवशी झालेल्या गोंधळात पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणी गंभीर दखल घेत कारवाईची गरज व्यक्त केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
कोण आहेत तुषार दोशी?
Tushar Doshi हे महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ IPS अधिकारी असून विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सातारा येथील राडा प्रकरणामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. यापूर्वी Jalna येथील मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमार प्रकरणातही त्यांचे नाव समोर आले होते..












