सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

“साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा” इंद्रजीत देशमुख यांच्या भेटीने प्रोग्रेसिव्ह संकुलात चैतन्य – संध्या गायकवाड

On: November 8, 2025 10:44 AM
Follow Us:

फलटण – कोळकी (ता. फलटण) येथील प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शैक्षणिक संस्थेस मा. श्री. इंद्रजीत देशमुख माजी सनदी अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी सदिच्छा भेट दिली.

इंद्रजीत देशमुख हे एक ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी असून, सेवा निवृत्तीनंतर त्यांनी समाजकार्यासाठी आपले आयुष्य वाहिले आहे. जनविकास एज्युकेशन ट्रस्ट चे संचालक म्हणून त्यांनी विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. तसेच ‘शिवाम प्रतिष्ठान, घारेवाडी’च्या माध्यमातून समाजोपयोगी शिबिरे आयोजित करीत असतात. याशिवाय ते ‘पेट वॅगन’ या संस्थेचे सह-संस्थापक देखील आहेत.

देशमुख सर ‘काकाजी’ या नावाने ओळखले जातात. त्यांनी देशभरात जीवन कौशल्ये, प्रेरणा, वारकरी संप्रदाय व मूल्याधारित जीवन या विषयांवर असंख्य व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या भाषणांमधून जीवनात सकारात्मकता, संवेदनशीलता आणि मानवतेचे मूल्य रुजवण्याचा संदेश दिला जातो. ‘१००% परिणामकारक ठरेल असे आयुष्य घडवताना’ हा त्यांचा लोकप्रिय व्याख्यान विषय आहे.

या भेटीप्रसंगी प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या संचालिका सौ. संध्या विकास गायकवाड (मॅडम) यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,

हे ही वाचा  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त फलटणच्या या आठवडी बाजारात बदल 

“आज अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली. आपल्या महाराष्ट्राचे लाडके सुपुत्र, ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवीचा अर्थ संतवाणीतून समाजमनापर्यंत पोहोचवणारे, युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री. इंद्रजीत देशमुख (काकाजी) आमच्या संकुलात आले. हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे.”

“काकाजींनी शिक्षकांशी संवाद साधताना सांगितले की, येणारी पिढी प्रेमळ, आनंदी, सर्जनशील आणि संवेदनशील असावी. हिंसा, ईर्षा, द्वेष या भावनांपासून दूर राहून आनंदी व निकोप मन तयार करणारे शिक्षकच समाजाचा खरा पाया आहेत. त्यांच्या या मौलिक मार्गदर्शनामुळे संकुलात एक नवी ऊर्जा, एक वेगळे चैतन्य निर्माण झाले.”

“आज खरोखर धन्य झालो! ‘साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा!’ याची प्रचिती आज आली. आदरणीय काकाजी आणि जेष्ठ पत्रकार श्री. अरविंदभाई मेहता यांचे आम्ही शतशः आभार मानतो.”

या संस्मरणीय भेटीमुळे प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या शिक्षक, विद्यार्थी आणि व्यवस्थापनामध्ये उत्साहाचे आणि प्रेरणेचे नवीन वातावरण निर्माण झाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र प्रवासी वाहतूक चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

जनसंपर्काची ताकद अन् रोखठोक भूमिकेची ओळख; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राइड एलिट मध्ये सोबत मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आमदार सचिन पाटील

ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

error: Content is protected !!