सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

१०० वर्षीय सरूबाई मुंजवार यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवघ्या २४ तासांत आर्थिक मदत मंजूर

On: July 2, 2026 5:43 PM
Follow Us:

फलटण – फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १०० वर्षीय सरूबाई मुंजवार यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले. या मदतीमुळे त्यांच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया वेळेत पार पडून पुढील उपचार तातडीने सुरू करता आले.

सरूबाई मुंजवार या रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झाल्या. त्यांना फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेची आवश्यकता व्यक्त केली. उपचारासाठी सुमारे सव्वा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने त्यांच्या कुटुंबीयांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते.

नातेवाईकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयाच्या सहकार्याने २५ जून रोजी आर्थिक सहाय्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. अर्ज प्राप्त होताच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून तातडीने कार्यवाही केली आणि अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्यास मंजुरी दिली.

या त्वरित निर्णयामुळे उपचारात कोणताही विलंब झाला नाही. आवश्यक शस्त्रक्रिया वेळेत पूर्ण होऊन पुढील वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने सरूबाई मुंजवार यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अल्पावधीत आर्थिक सहाय्य मंजूर केले जाते. गरजू रुग्णांनी या योजनेबाबत अधिक माहिती किंवा मार्गदर्शनासाठी टोल-फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

हे ही वाचा  फलटण येथे ६ ऑक्टोबरला दहावे ‘नांदी साहित्य संमेलन’; ग्रंथ प्रदर्शनासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

“युवा महोत्सवातून तणावमुक्ती व सर्जनशीलतेला शास्त्रीय अधिष्ठान”— प्रा. डॉ.श्रीमती ज्योती जाधव

फलटण येथे ६ ऑक्टोबरला दहावे ‘नांदी साहित्य संमेलन’; ग्रंथ प्रदर्शनासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी; श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी घेतली पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

आमदार सचिन पाटील यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध; महेंद्र सूर्यवंशी – बेडके  यांची टीका

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिरात योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

फलटणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) गावागावात पक्ष संघटन बळकट करणार

error: Content is protected !!