सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

साताऱ्यात 30 ऑक्टोबर रोजी शाहू कला मंदिरात फोक प्रबोधनाचे कार्यक्रम

On: November 7, 2025 2:16 PM
Follow Us:

सातारा : महाराष्ट्राची लोकपरंपरा, संस्कृती आणि कलांचा उत्सव साजरा करण्यासाठी साताऱ्यात छत्रपतींच्या राजधानीत “फोक प्रबोधन” हा भव्य कार्यक्रम होत आहे.  हा विशेष सांस्कृतिक सोहळा गुरुवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता छत्रपती शाहू महाराज कला मंदिर, सातारा येथे रंगणार आहे. या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे.

या कार्यक्रमात महाराष्ट्राचे विविध पारंपरिक ग्रामीण लोकनृत्य, लोकगीत, पोवाडा, जलसा, नाट्यप्रयोग, आणि लोकसंगीत यांचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळणार आहे. सुमारे ४० पेक्षा जास्त  महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करणाऱ्या कलाकारांचा कलाविष्कार पाहण्यास मिळणार आहे.

महाराष्ट्राची लोक संस्कृती, लोकजीवन आणि परंपरांचा जिवंत आविष्कार एकाच प्रयोगातून साकारला जाण्याची ही साताऱ्यामध्ये पहिलीच वेळ आहे.

हे ही वाचा  दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे, दोन ग्रामसेवक व दोन शिपायांविरोधात चौकशी सुरू

“फोक प्रबोधन” हे फक्त मनोरंजनाचे माध्यम नसून, ग्रामीण कलावंतांना कलापीठ मिळवून देणारे आणि नव्या पिढीसमोर महाराष्ट्राच्या लोककलेचा वारसा जपणारे एक सांस्कृतिक अभियान आहे. या अभियानातून परंपरा जतन करताना नवीन पिढीलाही कलेची माहिती मिळणार आहे. कार्यक्रमात पारंपरिक वाद्य, लावणी, गोंधळ, पोवाडे, पिंगळा, वासुदेव, भारुड, गोंधळ आणि इतर पारंपरिक कलारूपे यांचा समावेश आहे .प्रेक्षकांसाठी ही एक अनोखी सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.

फोक प्रबोधन चे ऑनलाईन तिकीट BookMyShow वर उपलब्ध असून, साताऱ्यातील कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोककलेच्या या पर्वाचा आनंद घ्यावा, असे  आवाहन आयोजकांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

“नटसम्राट” गेला… रंगभूमीचा सम्राट हरपला!नाना पाटेकर यांचे निधन; अभिनयविश्वावर शोककळा

“युवा महोत्सवातून तणावमुक्ती व सर्जनशीलतेला शास्त्रीय अधिष्ठान”— प्रा. डॉ.श्रीमती ज्योती जाधव

आमदार सचिन पाटील यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध; महेंद्र सूर्यवंशी – बेडके  यांची टीका

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिरात योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

फलटणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) गावागावात पक्ष संघटन बळकट करणार

घराबाहेरील विद्युत प्रवाह ठरला जीवघेणा; काही क्षणांत शिंदे कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू

error: Content is protected !!