सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

श्रीमंत रामराजेंचा मास्टरस्ट्रोक : नगरपालिकेच्या उमेदवारांना शिवसेनेचे एबी फॉर्म!

On: November 17, 2025 11:24 AM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – फलटण नगरपालिका निवडणुकीतील सर्व चर्चांना पूर्णविराम देत आज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या राजे गटातील सर्व उमेदवारांना थेट शिवसेनेचे एबी फॉर्म देत मोठा राजकीय स्फोट केला आहे. त्यामुळे श्रीमंत रामराजे हे शिवसेनेतूनच फलटण नगरपालिका लढवणार, या चर्चेला आता प्रत्यक्ष पुष्टी मिळाली आहे.

आज नगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, नगराध्यक्ष पदासह एकूण 28 उमेदवार शिवसेनेच्या एबी फॉर्मवरून नामांकन दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे फलटण शहर, तालुका नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात धनुष्यबाण अधिक भक्कम होणार, यात शंका नाही.

खासदार गटाला ‘शेवटच्या क्षणी’ दिलेला मास्टरस्ट्रोक

शेवटच्या दिवशीच राजे गटाने उमेदवारांना एबी फॉर्म वाटत खासदार गटाला मोठा धक्का दिला आहे. हा राजकीय मास्टरस्ट्रोक किती प्रभावी ठरतो, हे 3 डिसेंबरच्या निकालानंतर स्पष्ट होईल. सत्तेतील एका प्रमुख पक्षातून  मा. सभापती आमदार श्रीमंत रामराजेंनी थेट निवडणुकीच्या रणसंग्रामात आपले उमेदवार उतरवल्याने राजे गटातील कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसत आहे.

फलटणचा निकाल ठरवणार जिल्ह्याचे पुढील राजकारण

फलटण नगरपालिकेचा निकाल हा सातारा जिल्ह्याच्या भविष्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कौलही फलटणच्या निकालावरूनच समजेल, अशी चर्चा आहे.

श्रीमंत रामराजे मुंबई दौऱ्यावर असताना मागे अनेक राजकीय हालचाली सुरू होत्या. विविध चर्चांना ऊत आले होते. मात्र, कोणालाही काही समजत नसताना शेवटच्या क्षणी शिवसेनेचे एबी फॉर्म वाटून श्रीमंत रामराजेंनी दिलेला हा “गोपनीय मास्टरस्ट्रोक” सध्या फलटण शहरात आणि जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

हे ही वाचा  सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शिवसेना पक्षाच्यावतीने स्वबळावर लढवा - उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

राजे गटाच्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल होणारा खालील व्हिडिओ पहा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

अभयसिंह जगताप यांचा पुन्हा एकदा सुसंस्कृतपणा भावला; पराभवानंतरही निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी आभार मेळावा

राष्ट्रवादीचे चेतन शिंदे फलटण पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या राजे गटासोबत?

सौ.पायल अमोल पवार यांची सांगवी पंचायत समिती गणातून उमेदवारीची पक्षश्रेष्ठींकडे मागणी;महादेव कोळी समाजाला संधी द्या समाजाची आग्रही भूमिका

सह्याद्री भैया कदम यांच्या प्रवेशाने फलटण तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली – मंत्री मकरंद आबा पाटील

सौ. वैशालीताई कांबळे यांना बरड जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी! ;कार्यकर्त्यांची राजे गटाच्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शिवसेना पक्षाच्यावतीने स्वबळावर लढवा – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

error: Content is protected !!