सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

बारामतीकरांचा नवा इतिहास सुनेत्रा अजित पवार यांचा विक्रमी विजय

On: May 4, 2026 9:18 PM
Follow Us:

बारामती : महाराष्ट्रातील बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी प्रचंड मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयात त्यांनी 2019 मध्ये अजित पवार यांनी केलेल्या विक्रमालाही मागे टाकले.
सोमवारी मतमोजणीच्या 24व्या फेरीअखेर उपलब्ध आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार यांनी तब्बल 2,18,930 मतांच्या फरकाने विजय मिळवला. हा फरक भारतातील कोणत्याही आमदार निवडणुकीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे.
या निवडणुकीत एकूण 23 उमेदवार होते. मात्र, कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला 1,000 मतांचाही टप्पा पार करता आला नाही. करुणा मुंडे यांना 125, तर अभिजीत बिचुकले यांना 121 मते मिळाली.
या निकालासह सुनेत्रा पवार यांनी उत्तर प्रदेशातील साहिबाबाद मतदारसंघात सुनील कुमार शर्मा यांनी 2022 मध्ये केलेला 2,14,835 मतांचा विक्रमही मोडीत काढला.
विजयानंतर पार्थ पवार यांनी माध्यमांशी बोलताना जनतेचे आभार मानले. “इतक्या मोठ्या फरकाने निवडून दिल्याबद्दल आम्ही जनतेचे ऋणी आहोत. अशा परिस्थितीत निवडणूक लढवावी लागेल, अशी अपेक्षा नव्हती,” असे ते म्हणाले.
दरम्यान, मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांनी हा विजय अजित पवार यांना श्रद्धांजली असल्याचे सांगितले. “बारामतीच्या जनतेने दाखवलेला विश्वास दादांच्या पवित्र स्मृतीला समर्पित आहे. कार्यकर्त्यांनी संयम राखावा, जल्लोष टाळावा,” असे आवाहन त्यांनी केले.
“हा शेवट नाही, तर नव्या बारामतीच्या उभारणीची सुरुवात आहे,” असेही त्या म्हणाल्या.

हे ही वाचा  श्रीमंत रामराजे आज घेणार मोठा राजकीय निर्णय; कोणता झेंडा घेणार हाती?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!