सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण बाजार समिती कडून हमीभावाने मका खरेदी साठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू

On: November 22, 2025 5:44 PM
Follow Us:

फलटण – कृषि उत्पन्न बाजार समिती फलटणचे मार्केट यार्ड  फलटण येथे आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेअंतर्गत बाजार समितीने शासनाच्या हमीभाव दराने खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.या केंद्रावर शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल २४००/- रुपये हमीभावाने खरेदी करण्यात येणार असल्याचे समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
      हंगाम २०२५ – २६ मध्ये मका खरेदीसाठी नाव नोंदणी सुरु झाली आहे.ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ऑनलाईन नोंदणी केली नाही, त्यांनी मुदतीत नाव नोंदणी करावी असे आवाहन बाजार समितीचे व्हा.चेअरमन श्री. भगवानराव होळकर यांनी केले आहे.
      बाजारामध्ये मका शेतमालाचे भाव पडल्याने फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मका हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले असून याकरिता सब एजंट म्हणून फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवड करण्यात आली आहे.
मका या शेतमालाचा हमीभाव २४००/-  रुपये प्रति क्विंटल असून, शेतमाल स्वच्छ करणेसाठीची सुविधा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या क्लिनिंग ग्रेडिंग युनिटवर सशुल्क उपलब्ध आहे.आणलेला मका या शेतमालाची आर्द्रता कमाल 14 टक्के इतकी असणे आवश्यक आहे.
   सन २०२५ – २६ च्या खरीप हंगामाची ७/१२ वर मका पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. आधार लिंक असलेला मोबाईल नंबर, आधार कार्ड व बँकेचे पासबुक घेवून प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी. नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने पीओएस मशिनद्वारे करण्यात येणार आहे. दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे.
ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे शेतमाल आणण्याची तारीख कळविण्यात येणार आहे, त्याचदिवशी खरेदी केंद्रावर माल आणावा असे  आवाहन समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी सांगितले.
      हमीभाव खरेदी बाबत अधिक माहितीसाठी फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक श्री.विठ्ठल जाधव मो.नं ७९७२४१७५४६  व समितीचे ग्रेडर श्री. कृष्णात सस्ते मो.नं. ९८९०४५६८२४ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. शंकरराव सोनवलकर यांनी दिलली आहे

हे ही वाचा  फलटण तालुक्यात घरगुती गॅस वितरणावर प्रशासनाचे लक्ष; तहसीलदारांकडून दैनंदिन अहवाल जाहीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी; श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी घेतली पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

आमदार सचिन पाटील यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध; महेंद्र सूर्यवंशी – बेडके  यांची टीका

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिरात योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

फलटणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) गावागावात पक्ष संघटन बळकट करणार

बजाजनगर येथे रामरक्षा आंदोलन; अयोध्या राम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एल्गार

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

error: Content is protected !!