सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणचे वीर सुपुत्र जवान विकास गावडे शहीद
उद्या बरड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

On: January 11, 2026 7:09 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले बरड (ता. फलटण) येथील जवान विकास विठ्ठलराव गावडे यांना दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेदरम्यान वीरमरण आले. दि. 10 जानेवारी 2026 रोजी घडलेल्या या दुःखद घटनेमुळे बरडसह संपूर्ण फलटण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
जवान विकास गावडे हे सुमारे दहा वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. देशाचे प्रतिनिधित्व करत संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेत कर्तव्य बजावत असताना त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या शौर्यपूर्ण बलिदानामुळे संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त होत असून, गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
उद्या सोमवार, दि. 12 जानेवारी 2026 रोजी बरड येथील पालखी तळ येथे जवान विकास गावडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हे ही वाचा  भारतीय पत्रकार संघाच्या फलटण कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!