सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण येथे पालकांसाठी ‘सुजाण पालकत्व’ विषयावर मा श्री इंद्रजीत देशमुख यांचे समुपदेशन सत्र

On: February 10, 2026 8:00 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी (फलटण) यांच्या वतीने दि. १३ फेब्रुवारी २०२६ (शुक्रवार) रोजी पालकांसाठी दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत *‘सुजाण पालकत्व’ या विषयावर समुपदेशन व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे सत्र अनंत मंगल कार्यालय, फलटण येथे संपन्न होणार आहे.
या समुपदेशन सत्रात मा. श्री. इंद्रजित देशमुख (काकाजी), संस्थापक , शिवम प्रतिष्ठान , घारेवाडी , कराड हे पालकांना मार्गदर्शन करणार असून, बदलत्या काळातील पालकांची भूमिका, मुलांचे संगोपन, त्यांचा शैक्षणिक व मानसिक विकास या विषयांवर सखोल व उपयुक्त मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तरी या समुपदेशन व मार्गदर्शन सत्रास सर्व माता-पिता पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. तसेच हे मार्गदर्शन सत्र परिसरातील सर्व पालकांसाठी खुले राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.  आजच्या या पिढीला घडविण्यासाठी योग्य असे अनमोल मार्गदर्शन देणारे प्रमुख वक्ते आदरणीय गुरुवर्य काकाजी ज्यांनी या देशाची युवा पिढी खूप चांगली व्हावी म्हणून अथक प्रयत्न करत असणारे , भारत बलशाली व्हावा , आपल्या देशातील तरुण ज्ञानाने प्रगल्भ ,विचारांनी कुशल व मनाने सुंदर व्हावेत यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. अशा दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड व प्राचार्या सौ. सुजाता गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हे ही वाचा  संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘संविधान गुण गौरव परीक्षा’; सुजाताताई बनसोडे यांच्या पुढाकारातून तीन ठिकाणी भव्य सहभाग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

कृतिशील शिक्षणातून बालकांचा सर्वांगीण विकास : वसुंधरा नाईक निंबाळकर

“आम्ही माणूस आहोत, तर माणुसकीचे जग तयार करणे गरजेचे” – इंद्रजीत देशमुख (काकाजी)

शिक्षणासोबत संस्कारांचा वारसा : प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंटमध्ये प्रज्ञा योग शिबीर उत्साहात संपन्न

संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘संविधान गुण गौरव परीक्षा’; सुजाताताई बनसोडे यांच्या पुढाकारातून तीन ठिकाणी भव्य सहभाग

५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

रोबोटिक स्वागताने रंगला विज्ञान महोत्सव! डिजिटल पद्धतीने ५३व्या प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन

error: Content is protected !!