सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण तालुक्यात घरगुती गॅस वितरणावर प्रशासनाचे लक्ष; तहसीलदारांकडून दैनंदिन अहवाल जाहीर

On: March 12, 2026 3:51 PM
Follow Us:

फलटण -आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये आणि वितरणात पारदर्शकता राहावी यासाठी प्रशासनाकडून घरगुती गॅस वितरणावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. याच अनुषंगाने फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी  तालुक्यातील घरगुती गॅस (एलपीजी) वितरणाचा अधिकृत दैनंदिन अहवाल प्रसिद्ध केला आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार फलटण तालुक्यात एकूण ९४ हजार ४१७ घरगुती गॅस ग्राहक नोंदणीकृत आहेत. यामध्ये एक गॅस जोडणी असलेले ४८ हजार २३७ तर दोन गॅस जोडणी असलेले ४६ हजार १८० ग्राहकांचा समावेश आहे.
गुरुवारच्या अहवालानुसार तालुक्यातील सर्व गॅस एजन्सीकडे मिळून सुरुवातीला २ हजार १९६ सिलिंडर शिल्लक होते. त्यानंतर १ हजार ६५६ सिलिंडरची नवीन आवक झाल्याने एकूण ३ हजार ८५२ सिलिंडर उपलब्ध झाले. दिवसभरात ४ हजार २९२ ग्राहकांनी गॅसचे बुकिंग केले असून प्रत्यक्षात २ हजार २११ घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले. दिवसअखेर १ हजार ६४१ सिलिंडर शिल्लक राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.
फलटण तालुक्यात एच. डी. लाटकर एचपी, सूर्या एचपी, सूर्यतारा एचपी, विक्रम भारत, विघ्नहर्ता भारत, पवार भारत, नंदन तरडगाव, सुदर्शन आसु भारत आणि दुर्वांकुर इंडेन या नऊ गॅस वितरक संस्था कार्यरत आहेत.
सध्या व्यावसायिक गॅसचा पुरवठा काही प्रमाणात मर्यादित असल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महसूल प्रशासन सतर्क आहे. तसेच घरगुती गॅसचा काळाबाजार किंवा हॉटेलमध्ये व्यावसायिक वापर होऊ नये यासाठी तहसीलदार व पुरवठा विभागाकडून गॅस एजन्सींच्या साठा व वितरणावर करडी नजर ठेवण्यात येत असून दररोज हा अहवाल तयार केला जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

हे ही वाचा  डॉ. संपदा मुंडे आत्महत्येचा तपास फास्टट्रॅक पद्धतीने करावा फलटण डॉक्टर असोसिएशनची मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी; श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी घेतली पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

आमदार सचिन पाटील यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध; महेंद्र सूर्यवंशी – बेडके  यांची टीका

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिरात योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

फलटणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) गावागावात पक्ष संघटन बळकट करणार

बजाजनगर येथे रामरक्षा आंदोलन; अयोध्या राम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एल्गार

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

error: Content is protected !!