सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

टंचाईच्या काळात फलटणच्या सूर्या एचपी गॅस एजन्सीचे आदर्श व्यवस्थापन; ११ हजार ग्राहक समाधानी

On: April 2, 2026 11:16 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई जाणवत असून अनेक ठिकाणी ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र, फलटण तालुक्यातील सूर्या एचपी गॅस एजन्सीने या परिस्थितीतही उत्कृष्ट व्यवस्थापन करत ग्राहकांचे समाधान राखले आहे.
फलटण शहरातील उपळेकर मंदिरासमोरील डॉ. बी. के. यादव यांच्या मालकीची ही एजन्सी असून, शहर व तालुक्यातील ११ हजारांहून अधिक ग्राहकांना सेवा पुरवली जाते. विशेष म्हणजे, ओटीपी उपलब्ध होताच प्रत्येक ग्राहकाला तात्काळ गॅस सिलेंडर देण्याची प्रभावी व्यवस्था एजन्सीकडून करण्यात आली आहे.
सध्या देशभरात टंचाईची परिस्थिती असतानाही, एकाही ग्राहकाला अडचण येऊ नये यासाठी एजन्सीकडून नियोजनबद्ध पद्धतीने वितरण सुरू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एजन्सीचे चेअरमन श्री. अमोल जगताप यांच्या प्रभावी नियोजन आणि व्यवस्थापनामुळेच ही किमया साध्य झाली असून, त्यांच्या कार्याचे ग्राहकांकडून कौतुक होत आहे.
याबाबत बोलताना श्री.अमोल जगताप म्हणाले, “ग्राहकांना एकदा गॅस टाकी मिळाली की त्यांचे महिनाभराचे इंधन सुनिश्चित होते. त्यामुळे अनावश्यक गर्दी होत नाही. ओटीपी मिळताच प्रत्येक ग्राहकाला तात्काळ सिलेंडर देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.”

हे ही वाचा  महात्मा फुले जयंतीनिमित्त समता परिषद सातारा यांच्या वतीने फलटणमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!