फलटण – फलटण येथील छत्रपती शिवाजी वाचनालय हे दिलेल्या वेळेनुसार सकाळी सुरू होत नसल्यामुळे वाचकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नियमित अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थी व वाचकांना ताटकळत थांबावे लागत आहे.
वाचनालयाच्या बाहेर लावलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी सुरू होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात उशिरा उघडले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन वेळेचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.












