सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

135 व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात अध्यक्ष हरीश काकडे यांचे नियोजन ठरले लक्षवेधी!!

On: April 15, 2026 1:29 PM
Follow Us:

फलटण – फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला जयंती महोत्सव 2026 हा अत्यंत भव्य, देखणा आणि प्रेरणादायी ठरला. अध्यक्ष हरीश काकडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या नियोजनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
बारामती पुलापासून पंचायत समिती फलटण तसेच शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक( छत्रपती शिवाजी महाराज चौक सजावट ), डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते महावीरस्तंभ या परिसरात उभारण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उभारलेली कोलंबिया  युनिव्हर्सिटी लायब्ररी मधील बाबासाहेबांनी अभ्यास केलेल्या ग्रंथालयाची प्रतिकृती हे प्रमुख आकर्षण ठरले. त्यासोबतच उभारलेली तथागतांची मूर्ती आणि संपूर्ण सजावट जयंतीच्या भव्यतेला साजेशी होती.
भव्य मिरवणुकीतून बाबासाहेबांच्या कार्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. त्यांच्या कायद्यामुळे महिलांना विविध क्षेत्रात सन्मानाने कार्य करण्याची संधी मिळाली असून, त्यांच्या पत्रकारितेच्या कार्याचा वारसा देखील यावेळी जनतेसमोर प्रभावीपणे मांडण्यात आला.
या जयंती महोत्सवाबद्दल जनतेमधूनही उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्या. संतोष अहिवळे यांनी सांगितले की, “जयंतीचा सोहळा अत्यंत नेत्रदीपक झाला. नियोजन खूप छान होते. बाबासाहेबांच्या कार्याला साजेसा उत्सव पाहून मन भरून आले.”
तसेच विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांत असा उत्कृष्ट कार्यक्रम पाहिला नव्हता. सुरुवातीच्या शंकांना छेद देत जयंती मंडळाने प्रभावी नियोजन करून सर्वांना सकारात्मक संदेश दिला. समाजाने अशा कार्याला पाठबळ द्यावे.”
एकूणच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 2026 हा फलटण शहरासाठी एक आदर्श आणि स्मरणीय उत्सव ठरला असून, अध्यक्ष हरीश काकडे व संपूर्ण जयंती समितीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

हे ही वाचा  गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉलची जागा निश्चित; १३ सप्टेंबरचा आठवडी बाजार नव्या ठिकाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

बाप्पा कुठे हरवला?
गर्दीत, दिखाव्यात की आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर?

घरगुती गणपती स्थापना सोहळ्याचे फोटो पाठवा; दिवाळी विशेषांकात नाव-पत्त्यासह प्रसिद्धी

गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉलची जागा निश्चित; १३ सप्टेंबरचा आठवडी बाजार नव्या ठिकाणी

आरडी ग्रुप फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवाला डबल महाराष्ट्र केसरीसह साताऱ्याचे पालकमंत्री उपस्थिती लावणार?

संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या ७३१ व्या पुण्यतिथीनिमित्त फलटणमध्ये रथयात्रेचा शुभारंभ

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा: १७ व १८ जुलैसाठी वाहतूक मार्गात मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

error: Content is protected !!