सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

इंजिनिअरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट व युवाशक्ती फाउंडेशनचा फलटणमध्ये उद्या भव्य रोजगार मेळावा; २०००+ नोकरीच्या संधी

On: April 18, 2026 7:10 PM
Follow Us:


फलटण – इंजिनिअरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत यशवंतराव चव्हाण हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, फलटण येथे पार पडणार आहे.
या रोजगार मेळाव्यात २० पेक्षा अधिक नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून २००० पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
मेळाव्यासाठी १०वी, १२वी उत्तीर्ण, आयटीआय (कोणत्याही ट्रेड), तसेच इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल व E&TC या शाखांतील डिप्लोमा धारक आणि सर्व शाखांतील पदवीधर उमेदवार पात्र असतील. तसेच CNC ऑपरेटर पदांसाठीही भरती होणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १५ ते ३० हजार रुपये वेतन देण्यात येणार असून ८ तासांची ड्युटी व ओव्हरटाईमची सुविधा उपलब्ध असेल. याशिवाय जेवण, चहा, नाश्ता, बस व मेडिक्लेम यांसारख्या सुविधा कंपन्यांकडून देण्यात येणार आहेत. वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे अशी ठेवण्यात आली आहे.
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
संपर्क: 9021741399 / 8766973726 / 8329700193 / 7722084204

हे ही वाचा  मॅग्नेशिया कंपनी विस्तारासाठी MIDC मध्ये महिन्याभरात जागा; रोजगारनिर्मितीला चालना, अतिरिक्त MIDC बाबत मंत्री सामंतांचे स्पष्ट संकेत!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!