सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

नराधमाला फाशी द्या, अन्यथा आमच्या ताब्यात द्या; फलटणमध्ये नसरापूरच्या घटनेचा कडाडून निषेध

On: May 4, 2026 9:11 PM
Follow Us:

लोकमान्य टिळक पुतळा परिसरात जनक्षोभ; ‘शक्ती’ कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी

फलटण – पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका बालिकेवर झालेल्या अत्यंत दुर्दैवी आणि अमानुष घटनेच्या निषेधार्थ फलटणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नाशिक केंद्र, फलटणच्या वतीने आज शंकर मार्केट येथील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात एकत्र येऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांनी, “त्या नराधमाला फाशी द्यावी, अन्यथा त्याला आमच्या ताब्यात द्यावे, आम्ही त्याचा योग्य तो बंदोबस्त करू,” असा संतप्त आणि एकमुखी नारा दिला.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा दाखला दिला. ज्याप्रमाणे महाराजांनी रांजाच्या पाटलाला त्याच्या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा दिली होती, तशीच शिक्षा या नराधमाला देऊन समाजात एक कडक संदेश द्यावा, अशी मागणी करण्यात आली. समाजातली संवेदनशीलता संपत चालली असून अशा घटना वारंवार घडणे हे दुर्दैवी असल्याचे मत मान्यवरांनी नोंदवले.

अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी आणि आरोपींना तातडीने कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने ‘शक्ती’ कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून आरोपीला लवकरात लवकर फाशीच्या खांबावर चढवावे, हीच संपूर्ण फलटणकरांची भावना असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या निषेध सभेला फलटण शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, व्यापारी बांधव, विविध सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी काळ्या फिती लावून आणि घोषणाबाजी करून या घटनेचा निषेध केला.

हे ही वाचा  अपघाताचा बनाव उघड करुन सस्तेवाडीतील खुनाला वाचा फोडण्यात फलटण ग्रामीण पोलीसांना यश !

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!