सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा दहावीचा सलग सातव्या वर्षी १०० टक्के निकाल; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

On: May 9, 2026 5:24 PM
Follow Us:

फलटण – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा फलटण तालुक्याचा एकूण निकाल ९२.४४ टक्के लागला असताना, सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी (फलटण) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत सलग सातव्या वर्षी १०० टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे.

यंदाच्या परीक्षेत कु. विनंती किरण जगदाळे हिने ९४ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. चैतन्य गणपत तोरस्कर याने ९३.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. ज्ञानेश्वरी अमरजीत डोंबाळे हिने ९२.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक संपादन केला.

शाळेतील एकूण २८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल २५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून ३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे सौ. सुजाता गायकवाड, श्रीमती आशादेवी भराडे, महेंद्र कातुरे, सौ. आहिल्या कवितके, ज्ञानेश्वर जाधव, सौ. स्नेहल भोसले आणि सौ. अश्विनी भिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विशेष म्हणजे, सरस्वती शिक्षण संस्थेच्या कोळकी व गुणवरे येथील दोन्ही शाखांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागल्याने संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

या यशाबद्दल संस्थापक भिमराव माने, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप माने, कोषाध्यक्ष सौ. सविता माने, सचिव विशाल पवार, व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, प्राचार्या सुजाता गायकवाड, पर्यवेक्षक महेंद्र कातुरे, समन्वयिका अहिल्या कवितके तसेच माधुरी माने यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले.

हे ही वाचा  इंजिनीरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिटयूट फलटण मध्ये भरतीची संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!