सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

लोकशाही भारतच्या वृत्ताची दखल; सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या जन्म-मृत्यू विभागात तीन नवीन पंखे

On: May 18, 2026 11:41 AM
Follow Us:

नागरिकांच्या गैरसोयीबाबत वृत्त प्रसिद्ध होताच सिव्हिल रुग्णालय प्रशासनाची तात्काळ कारवाई

सातारा ( संतोष यादव):  क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील जन्म-मृत्यू प्रमाणपत्र वितरण विभागातील नागरिकांच्या गैरसोयीबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या विभागामध्ये नागरिकांना बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी व पंख्यांच्या सुविधेअभावी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे वृत्तामध्ये नमूद करण्यात आले होते.

विशेषतः रांगेच्या ठिकाणी पंख्यांची सुविधा नसल्याने नागरिकांना उन्हाळ्यात उकाड्याचा सामना करावा लागत होता. तसेच ज्या ठिकाणी रांग नव्हती, त्या ठिकाणी मात्र पंखे सुरू असल्याचेही समोर आले होते.

सदर वृत्त प्रसिद्ध होताच रुग्णालय प्रशासनाने तात्काळ दखल घेत जन्म-मृत्यू विभागात तीन नवीन पंखे बसवले. प्रशासनाच्या या त्वरित कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आहेत.

नागरिकांच्या समस्या माध्यमांद्वारे समोर आल्यानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत तत्काळ उपाययोजना केल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी व सुरक्षा रक्षक यांसारख्या अन्य मूलभूत सुविधाही लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हे ही वाचा  नीरा उजवा कालव्याचे अस्तरीकरण रखडले; पंढरपूर पुलावरील ग्रील गायब – नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

आळंदीत इंद्रायणीला महापूर; प्रशासनाचे वारकरी-भाविकांना सध्या आळंदीत न येण्याचे आवाहन

अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी

पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी ?

फलटण शहरातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू – मुख्याधिकारी निखिल जाधव

आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष श्री समशेरसिंह ना. निंबाळकर यांच्या हस्ते दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत महिला बचत गटांना लाखोंची मदत; प्रधानमंत्री आवास योजनेतील ३५ लाभार्थ्यांना अर्थसहाय्य धनादेशांचे वाटप

नळाला मोटार लावल्यास जप्ती; पाणी बचतीचे सातारा नगरपरिषदेचे आवाहन

error: Content is protected !!