सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून प्रा. सुकुमार कांबळे व अजिंक्य चांदणे यांच्यावर होत असलेली टीका दुर्दैवी – राहुल डंबाळे

On: May 23, 2026 2:06 PM
Follow Us:

“मतभेद असू शकतात; पण विचार मांडणाऱ्याला ‘चळवळद्रोही’ ठरवणे हा आंबेडकरी विचारांचा पराभव”

पुणे : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून आंबेडकरी चळवळीत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष राहुल धर्मा डंबाळे यांनी प्रा. सुकुमार कांबळे आणि अजिंक्य चांदणे यांच्या समर्थनार्थ एक भावनिक जाहीर खुले पत्र प्रसिद्ध केले आहे.

या पत्रामध्ये त्यांनी उपवर्गीकरणाच्या विषयावर स्वतंत्र आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडल्यामुळे काही घटकांकडून प्रा. कांबळे व चांदणे यांच्यावर होत असलेल्या वैयक्तिक टीकेचा निषेध व्यक्त केला आहे. “वेगळा विचार मांडणाऱ्याला थेट ‘चळवळद्रोही’ ठरवण्याचा प्रयत्न हा आंबेडकरी विचारसरणीला धरून नाही,” असे राहुल डंबाळे यांनी म्हटले आहे.

डंबाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, प्रा. सुकुमार कांबळे आणि अजिंक्य चांदणे यांनी अनेक वर्षे बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्ध यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अहोरात्र काम केले आहे. पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन बहुजन समाजात आंबेडकरी विचार पोहोचविण्याचे त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच, “लोकशाहीमध्ये मतभेद असणे स्वाभाविक आहे. विचारस्वातंत्र्य आणि परस्परांच्या मतांचा आदर हीच खरी लोकशाही आहे. मात्र आज काही लोकांकडून मतभिन्नतेमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच लक्ष्य केले जात आहे, हे दुर्दैवी आहे,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

या संपूर्ण वादात काही प्रस्थापित नेत्यांनी पूर्वी घेतलेल्या विरोधाभासी भूमिकांकडे समाजाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. “जे लोक स्वतःला चळवळीचे वारसदार समजतात, ते आज सोयीस्करपणे शांत आहेत; पण मैदानात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे,” असे डंबाळे म्हणाले.

शेवटी, “मतभिन्नता असली तरी प्रा. सुकुमार कांबळे आणि अजिंक्य चांदणे यांच्यावरील आमचा विश्वास कायम आहे. हजारो आंबेडकरी तरुण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत,” असा विश्वास राहुल डंबाळे यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा  धाडसी कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक योगेश बापुराव खरात यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!