सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

छत्रपती संभाजीनगरात महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; गुटखा माफियांविरोधात कठोर कारवाईचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आदेश

On: June 12, 2026 10:05 PM
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर येथे गुटखा माफियांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची अत्यंत गंभीर घटना घडली आहे. या घटनेची तातडीने दखल घेत नरहरी झिरवाळ यांनी संबंधित महिला अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त केला.

या घटनेचा तीव्र निषेध करत मंत्री झिरवाळ यांनी प्रशासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या गुटखा माफियांना कोणतीही गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित दोषी व्यक्ती तसेच या प्रकरणाशी संबंधित गुटखा माफियांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले आहेत.

यावेळी मंत्री झिरवाळ यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा शासनाचा निर्धार पुन्हा अधोरेखित केला. कोणत्याही प्रकारच्या दबावतंत्राला बळी न पडता कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तसेच बेकायदेशीर धंद्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध असून, अशा स्वरूपाच्या गंभीर घटनांमध्ये संबंधितांवर कठोर कारवाई करून प्रशासनाचे मनोबल कायम राखले जाईल, असा संदेशही या निमित्ताने देण्यात आला.

हे ही वाचा  फलटणच्या रस्त्यांवरील अतिक्रमणावर नगरपालिकेची कारवाई; अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष की अभय?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!