सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

टाकळवाड्यात शेतातील ऊस तोडणीवरून वाद; भाऊ व पुतण्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल

On: June 24, 2026 4:14 PM
Follow Us:

फलटण – फलटण तालुक्यातील टाकळवाडा येथे शेतजमिनीच्या वहिवाटीच्या वादातून ऊस तोडणीच्या कारणावरून एका शेतकऱ्यावर टिकावाच्या दांड्याने व कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

फिर्यादी अर्जुन आण्णा नाझीरकर वय 54, रा. टाकळवाडा, ता. फलटण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा व भाऊ तात्याराम आण्णा नाझीरकर यांच्यात शेतजमिनीच्या वहिवाटीवरून जुना वाद असून त्यासंदर्भातील दिवाणी दावा न्यायालयात प्रलंबित आहे.

दि. 21 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास तात्याराम नाझीरकर हे संबंधित शेतातील ऊस तोडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अर्जुन नाझीरकर शेतात गेले. त्यांनी ऊस तोडू नका, असे सांगितल्यावर “हे शेत माझे आहे, मध्ये पडलास तर जीवे मारेन,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

त्यानंतर दुपारी सुमारे 3.15 वाजता शेजारील ओढ्याजवळ ऊस कुटी मशीनने कुटला जात असताना जाब विचारल्याच्या कारणावरून संतोष तात्याराम नाझीरकर यांनी टिकावाच्या दांड्याने डोक्यावर मारहाण केली, तर तात्याराम नाझीरकर यांनी कुऱ्हाडीच्या तुंब्याने डाव्या हाताच्या कोपरावर व उजव्या हातावर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच दोघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

जखमी अर्जुन नाझीरकर यांच्यावर प्राथमिक वैद्यकीय उपचार करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सागर अभंग करीत आहेत.

हे ही वाचा  अपघाताचा बनाव उघड करुन सस्तेवाडीतील खुनाला वाचा फोडण्यात फलटण ग्रामीण पोलीसांना यश !

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!