फलटण : फलटण शहरासह तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाणारा श्रीराम सहकारी साखर कारखाना सध्या बंद असल्याने कामगार आणि ऊस उत्पादकांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत सोमवार, 6 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता कोळकी ता. फलटण येथील अनंत मंगल कार्यालयात सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीपूर्वी श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे सभासदांना आवाहन केले आहे. त्यांनी सर्व सभासदांनी आपला सभासद क्रमांक सोबत घेऊन बैठकीस उपस्थित राहावे, असे म्हटले आहे.
तसेच, “श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद करण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून कुटील डाव रचला जात आहे. कारखान्याचे भविष्य आणि पुढील वाटचाल याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली असून, प्रत्येक सभासदाची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे,” असा संदेश त्यांनी दिला आहे.
रामराजे यांनी आपल्या स्टेटसमध्ये “संघर्ष… संघर्ष… संघर्ष…” अशी ठळक टॅगलाईन वापरत कारखाना सुरू करण्यासाठी लढा उभारण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सोमवारची सभा श्रीराम कारखान्याच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे.
श्रीराम कारखाना सुरू करण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांची संघर्षाची हाक
By Team LBNN
On: July 5, 2026 9:44 AM







