सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी

On: July 6, 2026 8:23 AM
Follow Us:

सातारा – भारतीय हवामान विभागाने (IMD) सातारा जिल्ह्यातील घाटमाथा व दुर्गम भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या, बालवाड्या तसेच सर्व माध्यमांच्या (शासकीय, निमशासकीय व खाजगी) प्राथमिक व माध्यमिक शाळांना सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून या तालुक्यांमध्ये सातत्याने जोरदार पाऊस सुरू असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून सखल भागात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा धोकादायक ठरू शकते. तहसीलदार, तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच शालेय शिक्षण विभागाच्या २ ऑगस्ट २०१९ च्या परिपत्रकानुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. संबंधित सर्व शाळा प्रशासनाने आदेशाची तात्काळ आणि काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाल्यांच्या परिसरात न जाण्याचे आणि हवामान विभाग व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा  फिरंगाई देवी, महादेव व भैरवनाथ यात्रेसाठी फलटण नगरपालिकेची खर्चास मंजूरी ; ४६ विषयांवर सविस्तर चर्चा बहुतांश सर्व ठराव बहुमताने मंजूर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

फलटण–पंढरपूर रेल्वे प्रकल्पासाठी चौपट नुकसानभरपाईची मागणी – मा. खा. रणजितसिंह ना. निंबाळकर

आळंदीत इंद्रायणीला महापूर; प्रशासनाचे वारकरी-भाविकांना सध्या आळंदीत न येण्याचे आवाहन

पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी ?

फलटण शहरातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू – मुख्याधिकारी निखिल जाधव

लोकशाही भारतच्या वृत्ताची दखल; सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या जन्म-मृत्यू विभागात तीन नवीन पंखे

आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष श्री समशेरसिंह ना. निंबाळकर यांच्या हस्ते दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत महिला बचत गटांना लाखोंची मदत; प्रधानमंत्री आवास योजनेतील ३५ लाभार्थ्यांना अर्थसहाय्य धनादेशांचे वाटप

error: Content is protected !!