सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणच्या कु. मानसी प्रमोद निंबाळकर यांची आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कामगिरी

On: July 9, 2026 9:32 PM
Follow Us:

इंग्लड – फलटण येथील माळजाई उद्यान समितीचे अध्यक्ष तथा फलटण बिल्डर्स असोसिएशनचे संस्थापक श्री प्रमोद निंबाळकर यांच्या कन्या कु. मानसी प्रमोद निंबाळकर यांनी इंग्लंडमधील केंब्रिज येथे असलेल्या अँग्लिया रस्किन विद्यापीठ (ARU) मधून मास्टर्स इन मेडिसिन ही पदव्युत्तर पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे.

विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात त्यांचे वडील श्री प्रमोद निंबाळकर हे कुटुंबीयांसह उपस्थित होते. यावेळी मानसी यांच्या या यशस्वी शैक्षणिक वाटचालीचा आनंद कुटुंबीयांनी साजरा केला.

कु. मानसी निंबाळकर यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल फलटण शहरासह विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. परदेशात उच्च शिक्षण घेऊन फलटणच्या शैक्षणिक परंपरेत त्यांनी मानाचा तुरा रोवला असून, त्यांच्या या यशामुळे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

हे ही वाचा  “आम्ही माणूस आहोत, तर माणुसकीचे जग तयार करणे गरजेचे” - इंद्रजीत देशमुख (काकाजी)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!