सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सचिन यादव यांच्या नेतृत्वाखाली गॅलेक्सी मल्टिस्टेटची ८ वी शाखा तर अवघ्या वर्षभरात बारामतीत दुसरी शाखा सुरू

On: July 10, 2026 9:09 PM
Follow Us:

बारामती : के. बी. ग्रुप ऑफ कंपनीज अंतर्गत कार्यरत गॅलेक्सी मल्टिस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.च्या ८ व्या शाखेचे उद्घाटन गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी बारामती येथे उत्साहात पार पडले. नवीन शाखेचे उद्घाटन गॅलेक्सी मल्टिस्टेटचे संस्थापक व चेअरमन तथा के. बी. ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक मा. श्री. सचिन यादव आणि बारामतीचे नगराध्यक्ष मा. श्री. सचिन सातव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, ग्राहक, सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवघ्या एका वर्षात बारामती शहरात गॅलेक्सी मल्टिस्टेटची दुसरी शाखा सुरू झाली असून, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध भागांत संस्थेचे जाळे विस्तारत आहे. राज्यातील ही संस्थेची ८ वी शाखा असून महाराष्ट्राबरोबरच देशातील इतर राज्यांमध्येही गॅलेक्सी मल्टिस्टेट विश्वासार्ह आर्थिक सेवा देत आपला विस्तार वेगाने करत आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना संस्थापक व चेअरमन मा. श्री. सचिन यादव यांनी सांगितले की, गॅलेक्सी मल्टिस्टेटचे उद्दिष्ट केवळ आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित नसून प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत विश्वासू भागीदार बनणे हे आहे. भविष्यात आणखी अनेक शहरांमध्ये शाखा सुरू करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत दर्जेदार आर्थिक सेवा पोहोचविण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गरजेच्या वेळी तात्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी गॅलेक्सीची गोल्ड लोन सुविधा अनेक ग्राहकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

के. बी. ग्रुप ऑफ कंपनीज हा कृषी, जैविक शेती, निर्यात, सहकार, आयुर्वेद आणि इतर विविध क्षेत्रांत कार्यरत असलेला अग्रगण्य उद्योगसमूह आहे. करार शेतीच्या माध्यमातून समूहाने २५ हजार शेतकऱ्यांना जोडत युरोपियन देशांमध्ये दररोज १५ टन कृषी उत्पादनांची निर्यात करण्याचा टप्पा गाठला आहे. तसेच २ हजारांहून अधिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देत शेतकरी विकास आणि आर्थिक सक्षमीकरणासाठीही समूह कार्यरत आहे.

गॅलेक्सी ग्रुपची वार्षिक उलाढाल सुमारे १७५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून, फलटणमध्ये ठेवीदारांचा विश्वास संपादन केल्यानंतर आता बारामतीमध्येही संस्थेने आपले मजबूत पाऊल टाकले आहे.

यावेळी बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी गॅलेक्सीच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे आणि वाढत्या शाखा विस्ताराचे कौतुक केले. बारामतीसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरात दुसरी शाखा सुरू होणे ही नागरिकांसाठी आनंदाची बाब असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना अधिक विश्वासार्ह आणि दर्जेदार आर्थिक सेवा सहज उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी नगराध्यक्ष तथा माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, किरण तावरे, फलोत्पादन संघाचे चेअरमन वसंत घनवट, भाऊसाहेब काटे आणि ॲड. खारतोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा  संस्था व व्यक्तींना पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!