सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण तालुक्यातील होळ येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; दोघे ताब्यात

On: July 12, 2026 6:36 PM
Follow Us:

फलटण : फलटण तालुक्यातील होळ येथे बनावट दूध तयार होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्यानंतर संबंधित पथकाने धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत बनावट दूध निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायने व पावडर जप्त करण्यात आली असून, दोघांना फलटण ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

दूध आणि दूधजन्य पदार्थांचा प्रत्येकाच्या दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. त्यामुळे अशा प्रकारे बनावट दूध तयार होण्याच्या घटना समोर येणे ही गंभीर बाब मानली जात आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात तसेच परिसरात खळबळ उडाली आहे.

राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सातत्याने कारवाया सुरू आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा कारवायांना अधिक गती मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभर सुरू असलेल्या या धडक मोहिमेअंतर्गत फलटण तालुक्यातील होळ येथे ही कारवाई करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना भेसळीबाबत संशय आल्यास तातडीने संबंधित विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा  प्रेमसंबंधांच्या त्रिकोणातून अमानुष खून; लाकूड कापायच्या मशीनने मृतदेहाचे केले तुकडे|फलटण तालुका हादरला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!