सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत उद्या फलटणमध्ये वॉर्ड सभा

On: July 27, 2026 3:36 PM
Follow Us:

फलटण – भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियानांतर्गत फलटण नगरपरिषदेमार्फत मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत बीएसएनएल कार्यालयाशेजारील नगरपरिषदेच्या सभागृहात वॉर्ड सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभांमध्ये संबंधित प्रभागातील गैरहजर, स्थलांतरित, मयत व दुबार (ASDD) मतदारांची भागनिहाय यादी वाचून दाखविण्यात येणार असून, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीची नोंद घेण्यात येईल. त्यानंतर संबंधित बीएलओ (BLO) मार्फत प्रत्यक्ष पडताळणी करून आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

प्रत्येक प्रभागातील ASDD मतदारांची भागनिहाय यादी तयार करण्यात आली असून, मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शहरातील सर्व नागरिकांना आपल्या प्रभागातील वॉर्ड सभेला उपस्थित राहून मतदार यादी शुद्धीकरणाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

“अचूक व अद्ययावत मतदार यादी हा सक्षम लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे सर्व नागरिक तसेच बीएलए (BLA) यांनी वॉर्ड सभेला उपस्थित राहून या अभियानास सहकार्य करावे,” असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

हे ही वाचा  फलटणमध्ये ७ सप्टेंबरला जनता दरबार; नागरिकांनी तक्रारी २५ ऑगस्टपर्यंत जमा करण्याचे आवाहन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

फलटणमध्ये ७ सप्टेंबरला जनता दरबार; नागरिकांनी तक्रारी २५ ऑगस्टपर्यंत जमा करण्याचे आवाहन

गौरी-गणपती उत्सवापूर्वी फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा; फलटण तालुका काँग्रेसची मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडे निवेदनातून मागणी

मुख्याधिकारी निखिल जाधव यांचा धडक निर्णय; चायनीज मांजा विक्री आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द, घरातून विक्री करणाऱ्यांवरही कडक कायदेशीर कारवाई होणार !

फलटणमध्ये चायना मांजामुळे माजी सैनिकाचा गळा कापला; पतंगप्रेमी चायना मांजा वापरणार की टाळणार?

फलटणच्या अंतर्गत रस्त्यांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर; रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठपुराव्याला यश

क्रांतिसिंह नाना पाटील गृहरचना संस्थेच्या सदस्यांना आवास योजनेचा लाभ देण्याची मागणी; परिसराला “क्रांतिसिंह नाना पाटील नगर” नाव देण्याचाही आग्रह

error: Content is protected !!