सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

त्या नामांकित बिल्डरांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

On: August 26, 2026 8:47 PM
Follow Us:

सातारा – फलटण शहराचे उपनगर म्हणून ओळख असलेल्या कोळकी येथील जमीन भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतरीत करण्याच्या प्रक्रियेत कथीत बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या तीन नामांकित बिल्डरांच्या कोठडीत आणखीन वाढ करण्यात आली असून दि. २५ रोजी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी अद्याप फरार आहेत.

कोळकी ता. फलटण येथील जमीन भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतरीत करण्याच्या प्रक्रियेत बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या आदेशानुसार निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार रणधीर धनसिंगराव भोईटे, निखिल रामदास देवकर, प्रवीण ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, रामचंद्र ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, अभिजीत तुकाराम इंगळे, राजेंद्र सदाशिव कापसे, विक्रम महादेवराव झांजुर्णे, विरेंद्र विक्रम झांजुर्णे सर्व रा. फलटण अशा आठ नामांकित बिल्डरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रणधीर भोईटे, राजेंद्र कापसे व विक्रम झांजुर्णे या नामांकित बिल्डरांना अटक केली होती. अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दि. २४ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना दि. २५ ऑगस्ट रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा  प्रेमसंबंधांच्या त्रिकोणातून अमानुष खून; लाकूड कापायच्या मशीनने मृतदेहाचे केले तुकडे|फलटण तालुका हादरला

दरम्यान या गुन्ह्यात गुन्हा दाखल झालेल्या आठ जणांपैकी पोलिसांना केवळ तिघांनाच अटक करण्यात यश प्राप्त झाले असून अन्य संशयीत आरोपी अद्याप पोलिसांना मिळून आलेले नाहीत.

सदर प्रकरणात गुन्हा दाखल झालेले सर्वजण नामांकित असून सदर बनावट मूल्यांकन दाखला कोणी तयार केला, तो संबंधित कार्यालयाच्या नावाने कसा सादर करण्यात आला, त्याच्या आधारे जमीन वर्ग-१ करण्याची प्रक्रिया कशी पार पडली आणि या प्रकरणात संबंधित जमीनधारकांची नेमकी भूमिका काय होती. यामध्ये प्रशाकीय यंत्रणेमधील कोणाचा सहभाग आहे का याची उत्तरे मिळणे अपेक्षित असताना या प्रकरणाबाबत अत्यंत गोपनीयता पाळली जात असल्याने उलटसुलट चर्चा व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!