सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

मुधोजीच्या शिरपेचात मानाचा तुरा! प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांची कुलगुरू प्रतिनिधी म्हणून निवड

On: August 27, 2026 10:33 AM
Follow Us:

फलटण : मुधोजी महाविद्यालय, फलटणचे मा. प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राचार्य निवड समितीवर कुलगुरूंचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. ही निवड फ. ए. सोसायटी, फलटण तसेच मुधोजी महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानास्पद मानली जात आहे.

प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांच्या संशोधन, अध्यापन, पारदर्शक प्रशासन, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम, शिस्त, क्रीडा, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, कार्यक्षमता, कौशल्यवृद्धी कार्यशाळा, सेमिनार तसेच गुणवर्धक शैक्षणिक उपक्रमांचा विचार करून ही निवड करण्यात आली आहे.

गतवर्षी मुधोजी महाविद्यालयाला मिळालेले ‘नॅक’चे A+ मानांकन, त्यासाठी करण्यात आलेली सुसूत्र तयारी, महाविद्यालय परिसराचे सुशोभीकरण, ब्रँडेड कॅम्पस तसेच विविध सुविधांमध्ये करण्यात आलेली वाढ यामध्ये संस्थेच्या सहकार्याने प्राचार्य प्रो. डॉ. कदम यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याची ही निवड म्हणजे एकप्रकारे पावतीच असल्याचे मानले जात आहे.

त्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व, कार्यक्षमता, सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी आणि सम्यक दृष्टिकोन यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळाली आहे. नवीन शैक्षणिक धोरण-२०२०च्या अनुषंगाने महाविद्यालयाला वाढत्या स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी केलेली धडपडही विशेष उल्लेखनीय आहे.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ग्रंथवाचन, लेखन तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांना त्यांनी दिलेले प्राधान्यही कौतुकास्पद आहे. त्यामुळेच प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांची महत्त्वाच्या प्राचार्य निवड समितीवर कुलगुरूंचे प्रतिनिधी म्हणून झालेली निवड योग्य असून, ते या जबाबदारीला निश्चितच न्याय देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

त्यांच्या या स्पृहणीय यशाबद्दल फ. ए. सोसायटीचे अध्यक्ष मा. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्राचार्य विश्वासराव देशमुख, प्रशासनाधिकारी मा. प्राचार्य अरविंद निकम तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचा  फलटण नगरपालिकेच्या अभ्यासिकेत वृत्तपत्रांचा अभाव ; ३-४ महिन्यांपासून वृत्तपत्र बंद; कर्मचारीही गैरहजर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!