सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

महाविद्यालयाने माजी विद्यार्थ्यांशी ऋणानुबंध जपले पाहिजेत : संजीवराजे ना. निंबाळकर

On: September 12, 2026 10:16 AM
Follow Us:

फलटण : महाविद्यालयातून शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकासाचे संस्कार घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत. अशा माजी विद्यार्थ्यांशी महाविद्यालयाने ऋणानुबंध घट्ट करून त्यांच्या अनुभवाचा, योगदानाचा व सहकार्याचा महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयोग करून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे आयोजित माजी विद्यार्थी मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी विद्यार्थी मा.आमदार  दीपक चव्हाण तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य डॉ. पार्श्वनाथ वैद्य उपस्थित होते.

संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालयाची स्थापना रयतसेवक श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी १९५७ साली केली. आजपर्यंत महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोन लाखांहून अधिक आहे. या सर्व माजी विद्यार्थ्यांची सरसकट सदस्य नोंदणी झाल्यास महाविद्यालयाच्या पाठीशी मोठी शक्ती उभी राहू शकते.

माजी विद्यार्थ्यांपैकी अनेक जण उच्च पदांवर कार्यरत असून विविध क्षेत्रांत समाजासाठी योगदान देत आहेत. काही विद्यार्थी काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्यांचे महाविद्यालयाशी असलेले योगदान आणि नाते महत्त्वाचे आहे. त्यामुळे शिक्षण, ज्ञान आणि समाजाप्रती योगदान देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या ऋणानुबंधाला आगामी काळात अधिक महत्त्व देऊन वाटचाल करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वार्षिक अहवालाचे वाचन माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव डॉ. संजय दीक्षित यांनी केले. मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी केले. यावेळी काही माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषद सदस्या मा. सौ. वैशाली कांबळे, प्रा. डॉ. बाळासाहेब कांबळे, माजी विद्यार्थी मंडळाचे खजिनदार श्री. पांडुरंग जाधव, श्री. वसंत मुळीक यांच्यासह माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेवटी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. एन. के. रासकर यांनी आभार मानले.

हे ही वाचा  शिक्षणासोबत संस्कारांचा वारसा : प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंटमध्ये प्रज्ञा योग शिबीर उत्साहात संपन्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!