सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

जंतर-मंतर आंदोलनापूर्वी अभिजीत दिपके यांना विमानातूनच अटक; ध्रुव राठी यांनाही पोलिसांनी घेतले ताब्यात!

On: October 10, 2026 2:36 PM
Follow Us:

नवी दिल्ली – कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी दिल्ली विमानतळावर विमानातूनच ताब्यात घेतले. जंतर-मंतर येथे आयोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिपके हे सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासह मुंबईहून दिल्लीला पोहोचले होते. विमान उतरल्यानंतर दिल्ली पोलिसांनी विमानात प्रवेश करून तिघांनाही ताब्यात घेतले. या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओ समोर आला असून, पोलिसांनी विमानात प्रवेश केल्यानंतर दिपके यांनी कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणारे प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी यांनाही दिल्ली पोलिसांनी गुरुग्राम येथील त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. याशिवाय CJPच्या कायदेशीर पथकाच्या प्रमुख रत्ना सिंह यांनाही ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत (SIR) कथित अनियमितता झाल्याचा आरोप CJPने केला आहे. या प्रक्रियेमुळे मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली होती.

दरम्यान, आंदोलन रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विविध भागांत नाकाबंदी करून प्रतिबंधात्मक कारवाई केली. जंतर-मंतर आणि मध्य दिल्लीतील परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, अनेक आंदोलकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दिपके यांनी अजिंक्य शिंदे यांच्याकडे आंदोलनाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविल्याचे सांगितले जात आहे. नेत्यांना ताब्यात घेऊनही आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. या कारवाईमुळे शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि प्रशासनाच्या भूमिकेवरून चर्चा सुरू झाली आहे.

हे ही वाचा  पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी, राज ठाकरे उद्या भेटणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!