सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण डॉक्टर प्रकरण|एसआयटी तपास पथकामध्ये एकूण आठ अधिकाऱ्यांच्या नेमणूकीत अध्यक्षपदी तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्विनी सातपुते

On: November 7, 2025 2:16 PM
Follow Us:

फलटण  – येथील पिडीत महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी एसआयटी प्रमुख तथा समादेशक राज्य राखीव बल गट क्रं-१ च्या तथा सातारा जिल्हा तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचेसह विशेष तपास पथकामध्ये पुणे ग्रामीण,सोलापूर ग्रामीण येथील अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. याबाबतचे आदेश समादेशक तेजस्वी सातपुते यांची नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान या विशेष तपास पथकामध्ये पुणे ग्रामीण अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, तपास अधिकारी तथा फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे, पुणे ग्रामीण लोणावळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड, कराड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष तपास पथकामध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक झाल्याने तपासाला गती मिळणार आहे.

हे ही वाचा  फलटण बाजार समिती कडून हमीभावाने मका खरेदी साठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू


या प्रकरणातील संशयित आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी तसा आदेश काढला आहे.त्यामुळे या तपासाला वेग येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

त्या नामांकित बिल्डरांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक; फलटण शहर पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा

डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी; श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी घेतली पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

आमदार सचिन पाटील यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध; महेंद्र सूर्यवंशी – बेडके  यांची टीका

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिरात योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

आदर्की खुर्द येथे रानडुक्कराच्या शिकारीप्रकरणी चौघांना अटक; वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल

error: Content is protected !!