सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणमध्ये हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई; १३ घरगुती गॅस सिलेंडर जप्त

On: March 16, 2026 7:39 PM
Follow Us:


फलटण – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पत्र क्र. संकीर्ण-2026/प्र.क्र.35/नापु-27 दि. ८ मार्च २०२६ अन्वये सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इंधन पुरवठा साखळीवर अनावश्यक ताण येऊ नये यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालय सातारा यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार फलटण तहसील व पुरवठा विभागातर्फे तालुक्यात भरारी तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे.
या पथकाद्वारे हॉटेल आस्थापने, चहाचे स्टॉल आदी ठिकाणी अचानक तपासणी करण्यात येत आहे. व्यवसायासाठी घरगुती गॅसचा वापर करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कलम ३ व ७ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याबाबत पूर्वसूचना देण्यात आली होती.
त्या अनुषंगाने आज दि. १६ मार्च २०२६ रोजी कोळकी व फलटण शहरात अचानक धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईदरम्यान एकूण १३ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले.
सदर कारवाई तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी पुरवठा निरीक्षक अश्विनी पोहरे, पुरवठा लिपीक अनिकेत केकाण, किरण चवरे तसेच शिपाई ओंकार गवारी यांचे सहकार्य लाभले.

हे ही वाचा  आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष श्री समशेरसिंह ना. निंबाळकर यांच्या हस्ते दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत महिला बचत गटांना लाखोंची मदत; प्रधानमंत्री आवास योजनेतील ३५ लाभार्थ्यांना अर्थसहाय्य धनादेशांचे वाटप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

फलटण–पंढरपूर रेल्वे प्रकल्पासाठी चौपट नुकसानभरपाईची मागणी – मा. खा. रणजितसिंह ना. निंबाळकर

आळंदीत इंद्रायणीला महापूर; प्रशासनाचे वारकरी-भाविकांना सध्या आळंदीत न येण्याचे आवाहन

अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी

पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी ?

फलटण शहरातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू – मुख्याधिकारी निखिल जाधव

लोकशाही भारतच्या वृत्ताची दखल; सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या जन्म-मृत्यू विभागात तीन नवीन पंखे

error: Content is protected !!