सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी;जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

On: May 24, 2026 9:16 AM
Follow Us:

सातारा –  बकरी ईद येत्या २८ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, हा सण कायद्याचे पालन करून शांततेत साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

बकरी ईद निमित्त जनावरांच्या कुर्बानीसाठी उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या कत्तलखान्यांसाठी कुरेशी समाजाने शहरी भागात संबंधित नगरपालिकेकडे तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडे आवश्यक परवानगीसाठी अर्ज करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटीची बैठक शिवतेज हॉल येथे पार पडली. या बैठकीस पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव, जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी तात्पुरत्या कत्तलखान्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि नगर पंचायतींसोबत बैठक घेऊन महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ अंतर्गत कत्तलखान्यांसाठी आवश्यक नियम व सुविधांची माहिती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

वाहतूक अधिनियम १९७८ मधील नियम ४७ नुसार वाहतूक करण्यात येणाऱ्या जनावरांची वाहतुकीपूर्वी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आरोग्य तपासणी करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सहायक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय तसेच जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय यांनी जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक प्रमाणपत्र द्यावीत, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

ईद निमित्त उभारण्यात येणाऱ्या कत्तलखान्यांना प्रशासनाने आवश्यक सहकार्य करावे, तसेच कत्तल प्रक्रियेनंतर नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी पोलीस अधीक्षक श्री. पिंगळे यांनी महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. या कायद्यानुसार गायी, गायीची वासरे, वळू किंवा बैल यांसारख्या गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर निर्बंध घालण्यात आले असून, उत्पादक म्हशी व रेड्यांच्या संरक्षणाबाबतही कायद्यात तरतुदी करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा  पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचा प्रबोधन मंच ठरतोय परिवर्तनाचा केंद्रबिंदू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

बाप्पा कुठे हरवला?
गर्दीत, दिखाव्यात की आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर?

घरगुती गणपती स्थापना सोहळ्याचे फोटो पाठवा; दिवाळी विशेषांकात नाव-पत्त्यासह प्रसिद्धी

गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉलची जागा निश्चित; १३ सप्टेंबरचा आठवडी बाजार नव्या ठिकाणी

आरडी ग्रुप फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवाला डबल महाराष्ट्र केसरीसह साताऱ्याचे पालकमंत्री उपस्थिती लावणार?

संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या ७३१ व्या पुण्यतिथीनिमित्त फलटणमध्ये रथयात्रेचा शुभारंभ

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा: १७ व १८ जुलैसाठी वाहतूक मार्गात मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

error: Content is protected !!