सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

तथागत गौतम बुद्ध जयंतीत वेळेचे निर्बंध; वाद्य बंद, PI अरविंद काळे यांच्यावर दुहेरी निकषाचा आरोप!

On: May 2, 2026 10:03 AM
Follow Us:

फलटण : शहरात १ मे रोजी साजऱ्या झालेल्या तथागत गौतम बुद्ध जयंती मिरवणुकीत पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी रात्री १० वाजता वाद्य बंद करण्यास सांगितले.ही मिरवणूक शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असताना  या निर्णयामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली. जयंतीत केवळ बुद्ध वंदना व प्रबोधनात्मक गीतेच वाजवली जातात .
दरम्यान, नागरिकांनी आरोप केला की ज्या तत्परतेने पोलिसांनी वेळेचे निर्बंध लागू केले, त्याच तत्परतेने शहरातील मटका, जुगार, अवैध दारू विक्री, वेश्याव्यवसाय यांसारख्या बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई होत नाही.
या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस प्रशासन दुहेरी भूमिका घेत असल्याची टीका होत असून, सोशल मीडियावरही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
  अ‍ॅड. शाम अहिवळे, मंगेश आवळे, हरीश काकडे, अ‍ॅड. अनिकेत अहिवळे, संग्राम अहिवळे, प्रफुल अहिवळे, प्रवीण काकडे, विकी बोके, प्रीत खानविलकर, सुधीर अहिवळे आदींनी या घटनेचा निषेध नोंदवला असून, नियम सर्वांसाठी समान लागू करावेत, अशी मागणी केली आहे.

हे ही वाचा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर फलटणमध्ये शांतता बैठक पडली पार!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या ७३१ व्या पुण्यतिथीनिमित्त फलटणमध्ये रथयात्रेचा शुभारंभ

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा: १७ व १८ जुलैसाठी वाहतूक मार्गात मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले स्मारकास तत्त्वतः मंजुरी; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार

बकरी ईद निमित्त कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क – डीवायएसपी विशाल खांबे

बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी;जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळा २०२६ चे वेळापत्रक जाहीर

error: Content is protected !!