सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले स्मारकास तत्त्वतः मंजुरी; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार

On: July 5, 2026 9:27 AM
Follow Us:

सातारा : सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकास राज्य शासनाने तत्त्वतः मंजुरी दिल्याने समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शासनाने किल्ले प्रतापगडावर शूरवीर जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक उभारण्यास तत्त्वतः मंजुरी दिली असून, स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रस्ताव तातडीने अंतिम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांची मागणी मार्गी लागली आहे.

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आज सातारा येथे सकल नाभिक समाज आणि सातारा जिल्हा महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शासनाचे तसेच स्मारकाच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि संबंधित सर्वांचे आभार मानले. शूरवीर जिवाजी महाले यांच्या पराक्रमाला योग्य न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करत समाजबांधवांनी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सातारा जिल्ह्यासह विविध भागांतील मोठ्या संख्येने नाभिक समाजबांधव उपस्थित होते. प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षाही यावेळी समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

हे ही वाचा  फलटणमध्ये ‘रंग उत्सव 3.0’ होळी महोत्सवाचे भव्य आयोजन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या ७३१ व्या पुण्यतिथीनिमित्त फलटणमध्ये रथयात्रेचा शुभारंभ

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा: १७ व १८ जुलैसाठी वाहतूक मार्गात मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

बकरी ईद निमित्त कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क – डीवायएसपी विशाल खांबे

बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी;जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळा २०२६ चे वेळापत्रक जाहीर

तथागत गौतम बुद्ध जयंतीत वेळेचे निर्बंध; वाद्य बंद, PI अरविंद काळे यांच्यावर दुहेरी निकषाचा आरोप!

error: Content is protected !!