फलटण : मौजे दुधेबावी येथील राखीव वन गट क्रमांक 843 मधील अनधिकृतरीत्या तयार करण्यात आलेला अतिक्रमित रस्ता आज दि. 12 मे 2026 रोजी वनविभागाकडून हटविण्यात आला. या प्रकरणी Preliminary Offence Report क्रमांक 02/2025 दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी दाखल करण्यात आला होता.
वनअधिनियम 1927 चे कलम 26(1)(ड)(एच) व 26(4) नुसार आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दि. 15 एप्रिल 2026 रोजी भूमी अभिलेख कार्यालयाच्या मोजणीनुसार हद्द निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 या वेळेत अतिक्रमण निष्कासनाची कारवाई पार पडली.
ही कारवाई उपवनसंरक्षक श्री. अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत विविध वनपरिक्षेत्रातील अधिकारी व सुमारे 30 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. यासाठी 1 पोकलेन व 2 जेसीबीचा वापर करण्यात आला.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, सदर जागा आता अतिक्रमणमुक्त करण्यात आली असून 20 गुंठे वनक्षेत्रावर खोल समतल चर (CCT) काढण्यात आले आहेत.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, राखीव वनात अनधिकृत अतिक्रमण केल्यास संबंधितांवर 1 वर्षापर्यंत कारावास किंवा 5 हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.
दुधेबावी येथील राखीव वनातील अतिक्रमित रस्ता वनविभागाकडून हटवला; मोठी कारवाई
By Team LBNN
On: May 12, 2026 7:27 PM








