सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

जागतिक वन वणवा दिवस – 21 मार्च

On: March 22, 2026 8:14 PM
Follow Us:
---Advertisement---

जागतिक स्तरावर 21 मार्च हा दिवस वनसंवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी प्रामुख्याने वन वणवे (Forest Fires) या गंभीर समस्येबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. जागतिक वन दिन (International Day of Forests) दरवर्षी २१ मार्च रोजी साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश सर्व प्रकारच्या वनांचे महत्त्व आणि पर्यावरणातील त्यांची भूमिका याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे . संयुक्त राष्ट्रांनी २०१२ मध्ये या दिनाची घोषणा केली, ज्यामध्ये जंगलसंवर्धन, वृक्षारोपण आणि वणवा नियंत्रणाद्वारे पृथ्वीचे संरक्षण करण्याचा संदेश दिला गेला.
वन वणवा म्हणजे काय ? हा प्रश्न पडताच ब्राझीलमधील अ‍ॅमेझॉन जंगल  डोळ्यासमोर उभ राहतं आणि अंगावर काटा यायला लागतो …. जंगलाला नोव्हेंबर २०१९ आणि मे २०२० मध्ये भीषण आगी लागली होती. जवळपास तीन आठवडे हे जगातले सर्वात मोठे जंगल जळत राहिले. अ‍ॅमेझॉनच्या ‘जंगलाला आग’ याचा अर्थ पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण करणारा एक अतिशय मोठ्या  स्रोतास हानी झाली . अ‍ॅमेझॉनचे जंगल ही जगातली सर्वात मोठी परिसंस्था आहे. प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक अतिदुर्मीळ प्रजाती फक्त अ‍ॅमेझॉनमध्ये आढळतात. जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे वनसंपत्तीचीच केवळ हानी होते असे नाही, तर वन उपजाची क्षमताही कमी होते. जमिनीचा क्षय होतो आणि जमीन नापीक होते. पाण्याची पातळी खाली जाते. वन्यजीवांची होरपळ होते. वन्य प्राणी एकतर भाजून मरतात आणि जे वाचतात त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे ते उघड्यावर पडतात. अलीकडे अशा दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्येही अशा बऱ्याच घटना घडत असताना दिसत आहेत त्यासाठी जबाबदार कोण ?
          हा वणवा म्हणजे फक्त लागलेली आग नाही  तर निसर्गाच आयुष्य उध्वस्त होत असत त्या आगीमध्ये . एका सिगारेट मुळे अथवा शेतकऱ्याच्या निष्काळजीपणामुळे या वणव्याला मुक्या प्राणी – पक्षांना , कीटकांना, सरपटणाऱ्या प्राण्यांना तोंड द्यायला लागत.  आगीतून जीव मुठीत धरून सैराभर  पळत असतात हे स्वतःला  वाचवायचा प्रयत्न करतात . म्हणून तर म्हणतात लागलेल्या आगीत फक्त झाडं जळत नाही तर कित्येक प्राण्या – पक्ष्यांची  घरटी मोडत असतात एवढेच नव्हे तर ती छोटी – छोटी चिमणीची  पिले देखील त्या मधे जळून खाक होतात . सरपटणारे प्राणी जीवाच्या आकांताने पळत असतात . मोठ – मोठी झाडे जळून  खाली जमिनीवर कोसळतात आम्हाला वाचवा म्हणून जीवाच्या आकांताने ओरडतात पण निसर्गाच मन माणसाला समजलं असत तर  ! वणवे लागून निसर्गाची जीवित हानी झाली नसती .   वने ही निसर्गाचा श्वास आहेत . जंगलाच अस्तित्व जपलं तर आपलं अस्तित्व या पृथ्वीवर आहे .  वने केवळ वन्यजीवांचे घर नसून मानवी जीवनाचे  संसार देखील निसर्गाने पोसले आहेत. झाडे मानवी जीवन आणि पर्यावरणाचा मुख्य आधारस्तंभ आहेत. ती आपल्याला जगण्यासाठी आवश्यक ऑक्सिजन देतात, कार्बन डायऑक्साइड शोषून हवा शुद्ध करतात, सावली आणि फळे देतात, तसेच जमिनीची धूप रोखतात. झाडांमुळे पाऊस पडतो, तापमान नियंत्रित राहते आणि जैवविविधता टिकून राहते. झाडे ही निसर्गाची देणगी असून मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत . एकदा निसर्गाच्या प्रेमात पडून बघा म्हणजे निसर्ग तुम्हाला त्याची भाषा त्याच्या मनाच हितगुज करायला लागेल . अनेक सेवाभावी संस्था निसर्ग संरक्षणाचे तसेच गडकिल्ले संवर्धनाचे काम करत आहेतच पण तुम्ही एक पाऊल पुढे या …म्हणून मी या लेखाच्या माध्यमातून तरुण पिढीला सांगू इच्छिते निसर्गाचे संरक्षण करण्यास तुमचा ही मोलाचा वाटा असू द्या  कारण पृथ्वी आपला भार खूप सोसत आहे … हे आपल्या सर्वांना माहीतच आहे …




जाता जाता, एक झाड मानवास म्हणतो की,
जेथे जातो तेथे तू माझा संगती
हे मानवा कृपा करून विसरू नको
हिवाळ्यात तुझ्या शेकोटितील उब मी आहे
उन्हाळ्यात तुझ्या डोक्यावरील छाया मी आहे
माझी फळे प्रवासात तुझी भूक भागवितात
आणि त्यांचे रस तुझा सुकलेला घसा ओला करतात
तुझ्या घराचा मी खांब आहे
नदी नाल्यातून नेणारी तुझी नाव मी आहे
विश्रांती देणारा तुझा मेचक मीच आहे
मी तुझ्या कुदळीचा दांडाही आहे
मी नांगराचा फाल आहे, मी गाडीचे चाक आहे
पाळण्यामध्ये तुला जोजवनाराही मीच होतो
आणि स्वर्गाच्या स्वारीचा वाहकही मीच असणार आहे
हे मानवा कृपा करून विसरू नको.

ॲड. रोहिणी संजय भंडलकर
LLB. LL.,M. MA(Sociology)
फलटण ता. फलटण जि. सातारा
मोबाईल नंबर 9970649894

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!