सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये भव्य कार्यक्रमांचे आयोजन

On: July 27, 2026 9:43 PM
Follow Us:

फलटण – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रभावशाली समाजसुधारक, लोककवी आणि थोर साहित्यिक होते. आपल्या धारदार लेखणीतून आणि खणखणीत शाहिरीतून त्यांनी उपेक्षित, शोषित, कामगार आणि दलित समाजाच्या वेदनांना वाचा फोडत सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला. यंदा त्यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त फलटण शहर व तालुका जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही १ ऑगस्ट २०२६ रोजी फलटण शहरात मोठ्या उत्साहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. विविध सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने ३१ जुलै २०२६ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर, मंगळवार पेठ, फलटण येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच त्याच दिवशी मध्यरात्री १२ वाजता पाचबत्ती चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येणार आहे.

१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर, मंगळवार पेठ येथून सुरू होऊन पाचबत्ती चौक, बारामती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ, राजे उमाजी नाईक चौक, गजानन चौक, मनमोहन राजवाडा मार्गे पुन्हा पाचबत्ती चौकात समारोप होणार आहे.

या भव्य मिरवणुकीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिकृतीसह विविध महापुरुषांचे देखावे, आधुनिक ध्वनिव्यवस्था, आकर्षक रोषणाई  हे प्रमुख आकर्षण असणार आहे.

या कार्यक्रमात सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन फलटण शहर व तालुका जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

हे ही वाचा  डीजेच्या खर्चाला फाटा, देऊन सरडे बंगला येथे उभारला संविधान स्तंभ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!