सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

डीजेच्या खर्चाला फाटा, देऊन सरडे बंगला येथे उभारला संविधान स्तंभ

On: April 22, 2026 9:43 AM
Follow Us:

डीजेवर पैसे उडवण्यापेक्षा संविधानाचा सन्मान करणे आम्हाला जास्त महत्त्वाचे

फलटण – महाराष्ट्रभर सध्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. मात्र, केवळ डीजेच्या तालावर नाचून किंवा अवाढव्य खर्च करून मिरवणुका काढण्यापेक्षा, गावाच्या वैभवात भर घालणारा आणि येणाऱ्या पिढीला दिशा देणारा उपक्रम सरडे बंगला (ता. फलटण ) येथील तरुण वर्गाने राबविला आहे. ७५ व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून या तरुणांनी गावात भव्य संविधान स्तंभ’ उभारून संपूर्ण जिल्ह्यासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

डीजेच्या खर्चाला फाटा, देऊन सरडे बंगला येते संविधान स्तंभ बांधून ‘संविधान चौक’ नाव दिले.

आजकाल जयंती उत्सवाच्या नावाखाली लाखो रुपयांची वर्गणी गोळा करून ती केवळ डीजे आणि क्षणिक डामडौलावर खर्च केली जाते. परंतु, सरडे बंगला मोरे वस्ती येथील तरुणांनी या परंपरेला छेद दिला आहे. “जयंती नाचून नव्हे, तर वाचून साजरी करा” हा संदेश केवळ भाषणापुरता मर्यादित न ठेवता, त्यांनी कृतीतून उतरवला आहे. लाखो रुपये खर्च स्वतः करून गावातील मुख्य चौकाचे सुशोभीकरण केले आणि तिथे कायमस्वरूपी ‘संविधान स्तंभ’ उभारला, ज्यामुळे आता या चौकाला हक्काची ओळख मिळाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रत्येक गावात आणि शासकीय कार्यालयात संविधान अमृत महोत्सव साजरा करणे बंधनकारक असतानाही, अनेक ठिकाणी कर्मचारी आणि प्रशासकीय पातळीवर याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. मात्र, जिथे प्रशासन कमी पडले, तिथे सरडे येथील तरुणांनी पुढाकार घेतला. कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता, लोकसहभागातून आणि तरुणांच्या जिद्दीतून हा संविधान स्तंभ उभा राहिला आहे.
हा स्तंभ केवळ पाहण्याचे ठिकाण नसून, तो लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा प्रचार-प्रसार करणारा केंद्रबिंदू ठरणार आहे.
गावातून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक तरुणाला आणि मुलाला देशाच्या संविधानाची आठवण करून देण्याचे काम हा स्तंभ करेल.
मिरवणुकीचा खर्च एका दिवसात संपतो, पण हा स्तंभ गावाच्या इतिहासात कायमस्वरूपी सुवर्ण अक्षराने नोंदवला गेला आहे.
 
“आम्ही फक्त स्वतःच्या लोक वर्गणीतून तर आमच्या गावाला एक वैचारिक ओळख मिळावी हा आमचा उद्देश होता. डीजेवर पैसे उडवण्यापेक्षा संविधानाचा सन्मान करणे आम्हाला जास्त महत्त्वाचे वाटले.” असे सरडे बंगला येथील तरुण कार्यकर्ते बोलले आहे.

समाज कल्याण माध्यमातून फलटण गट विकास अधिकारी यांनी ऐक आदेश काढला होता 8 एप्रिल ते 14 एप्रिल जयंती संविधान सप्ताह ग्रामसेवक पोलिस पाटील आणि कोतवाल सह आरोग्य अधिकारी आशा सेविका सह इतर अधिकारी यांनी साजरा करावा त्याचे फोटो जियो टॅग फोटो असावे दररोराज अपलोड करावे असे आदेश होते  परंतु याचे पालन झाले की नाही परंतु सरडे गावापासूनआदेशाचे पालन करण्याचे म्हणून
सरडे बंगला येथील तरुणांनी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असून, महाराष्ट्रभर अशाच प्रकारे विधायक कामातून महापुरुषांची जयंती आणि संविधानाचा प्रचार प्रसार साजरी व्हायला हवी, अशी भावना पंचक्रोशीतील नागरिक व्यक्त करत आहेत. गावगावात असे ‘संविधान स्तंभ’ उभे राहिल्यास खऱ्या अर्थाने विचारांची क्रांती होईल, हे मात्र नक्की! असे बोलले जात आहे

हे ही वाचा  भगवान महावीर जयंतीनिमित्त आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे महावीर स्तंभास अभिवादन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!