सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये!; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आंदोलनकर्त्यांकडून जल्लोष

On: July 25, 2026 4:04 PM
Follow Us:

नवी दिल्ली – नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून गेल्या महिनाभरापासून दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी सातत्याने लावून धरली होती. याच मागणीसाठी पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र, २३ जुलै रोजी त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. त्यानंतरही कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली होती.

या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी व विविध स्तरांतून मोठा पाठिंबा मिळत होता. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम राहिले होते.

दरम्यान, आज (२५ जुलै) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची मोठी घडामोड समोर आली. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी उपस्थितांना  संबोधित करताना म्हणाले की , “काय म्हणत होते, या सरकारमध्ये राजीनामे दिले जात नाहीत?… झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये!” असे वक्तव्य केले.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपके यांच्या सह लाखो तरुण आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. देशभरातून या आंदोलनाचं कौतुक होत आहे.

हे ही वाचा  फलटणमध्ये आरपीआय (आठवले) गटाकडून दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांवरील लाठीचार्जचा तीव्र निषेध

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!