सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सोनम वांगचूक यांचे उपोषण संपले; CJP चा लढा कायम, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम भूमिका

On: July 24, 2026 9:16 AM
Follow Us:

नवी दिल्ली – NEET पेपर लीक प्रकरणावर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला मोठे वळण मिळाले आहे. तब्बल २६ दिवस आमरण उपोषण केलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर उपोषण मागे घेतले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून व्हिडिओ संदेशाद्वारे या प्रकरणावर प्रथमच सार्वजनिक भूमिका मांडली. मात्र, या घडामोडींनंतरही आंदोलन थांबणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Cockroach Janta Party (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे सोनम वांगचूक यांच्या निर्णयाचे स्वागत करत, त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, सोनम वांगचूक यांनी देशाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. तसेच, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NEET पेपर लीक प्रकरणाची नैतिक व राजकीय जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, ही मागणी पूर्ण होईपर्यंत जंतर-मंतरवरील CJP चे शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सोनम वांगचूक यांचे उपोषण संपले असले तरी आंदोलनाचा पुढील टप्पा अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा  सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आसिया पटेल यांचे एकल उपोषण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!