सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

श्रीराम साखर कारखान्याच्या सद्यस्थितीवर ६ जुलै रोजी सभासदांची बैठक

On: July 4, 2026 4:36 PM
Follow Us:

फलटण –  श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या  सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता कोळकी ता.फलटण येथील अनंत मंगल कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही बैठक श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर  यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, कारखान्याच्या सध्याच्या परिस्थितीबाबत तसेच पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

सध्या कारखाना बंद असल्याने कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, व्यापारी आणि इतर संबंधित घटकांवरही त्याचा परिणाम होत आहे. श्रीराम सहकारी साखर कारखाना हा फलटण तालुक्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखला जातो. तालुक्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात या कारखान्यावर अवलंबून असल्याने कारखान्याच्या भवितव्याबाबत सर्व स्तरांतून चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीकडे सभासदांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

या बैठकीस ऊस उत्पादक शेतकरी सभासद, सभासद बंधू-भगिनी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संबंधितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हाइस चेअरमन नितीन भोसले तसेच संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे ही वाचा  तलवार गेली आणि लेखणी आली,” या लेखणीच्या बळावर महात्मा फुलेंनी समाजजागृती केली; डॉक्टर बी. के. यादव 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!