सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

डॉ. संपदा मुंडे आत्महत्येचा तपास फास्टट्रॅक पद्धतीने करावा फलटण डॉक्टर असोसिएशनची मागणी

On: November 7, 2025 2:16 PM
Follow Us:

फलटण : फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांनी फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर आत्महत्येचे कारण लिहून ठेवले होते, असे समोर आले आहे.या घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी अशी मागणी फलटण डॉक्टर असोसिएशनने केली आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, सेवाकाळात डॉ. मुंडे यांना मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला, त्यामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे.

फलटण डॉक्टर असोसिएशनच्या वतीने प्रांताधिकारी फलटण सौ. प्रियांका आंबेकर यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या घटनेत जबाबदार असलेल्या शासकीय अधिकारी तसेच इतर संबंधित व्यक्तींची फास्टट्रॅक चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.” तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस आणि शासकीय यंत्रणांनी अधिक दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.अशा घटना समाजाला काळीमा फासणाऱ्या असून, वैद्यकीय सेवेत असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या आत्महत्येसारखी घटना अतिशय निंदनीय असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा  राज ठाकरे : महाराष्ट्राच्या राजकारणातील वेगळी ओळख निर्माण करणारे नेतृत्व

निवेदन देताना फलटण डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बी. के. यादव, उपाध्यक्ष डॉ. महेश शिंदे, खजिनदार डॉ. दत्ता चव्हाण, सचिव डॉ. ईशांत शिंदे, तसेच डॉ. सुधीर कुलकर्णी, डॉ. माधव पोळ, डॉ. जे. टी. पोळ, डॉ. दोशी, डॉ. सुनिता पोळ, डॉ. अशोक नाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

“युवा महोत्सवातून तणावमुक्ती व सर्जनशीलतेला शास्त्रीय अधिष्ठान”— प्रा. डॉ.श्रीमती ज्योती जाधव

फलटण येथे ६ ऑक्टोबरला दहावे ‘नांदी साहित्य संमेलन’; ग्रंथ प्रदर्शनासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी; श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी घेतली पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

आमदार सचिन पाटील यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध; महेंद्र सूर्यवंशी – बेडके  यांची टीका

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिरात योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

फलटणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) गावागावात पक्ष संघटन बळकट करणार

error: Content is protected !!